पूर्वकल्पना:
एक चाळीमध्ये राहणारे गृहस्थ आहेत, त्यांचे शेजारी सुट्टीच्या काळामध्ये गावी गेले होते. एक दिवस हे गृहस्थ बाहेरून घरामध्ये परतत असताना सामानाची ने-आण करणारी माणस त्यांना दिसतात . पुढे जाऊन ते बघतात तर त्यांच्या ही निदर्शनास येत की गावी गेलेले शेजारीच सुट्टी संपवून परतीचा प्रवास करून आले होते. खूप दिवसांनी गाठभेट झाल्यामुळे एकमेकांची विचारपूर सुरू झाली .. आता पुढे
पात्र :
गृहस्थ (मध्यम वर्गीय ) वय वर्ष ४०-५०
वेळ:
१ मिनिट ४० सेकंद
Best Audition Script in Marathi For Male | बेस्ट ऑडिशन स्क्रिप्ट इन मराठी फोर मेल
नमस्कार वाहिनी काय म्हणतास बाकी ..गावाक गेल्लास ना इलास कधी ?
नाय ..जाताना बारको भेटलेलो पण गडबडीत हुतो काय धड बोलकच गावाक नाय. बाकी सगळा ठीक ना. गावाकडे सगळे बारे हत ना. पण ह्या वर्षी वायच लवकर इलास वाटता , नाय म्हणजे दर वरसाक वटपौर्णिमा करूनच येतास ना म्हणाण ईचारलय . काय ओ.. बाकीचा मरो पण आयकलय ता खरा काय ..ता सावतांचा पिंक्या पळान गेला ? नाय म्हणजे वरचेवर कानावर इला बाकी काय नाय.
आता समजाक काय होया तेच्यात ? पयला वायचं कठीण हुता पण आता हे भंगले मोबाईल झाले त्याच्यामुळे हयली बातमी थय जावक काय येळ लागता.आणि आता कोणाक बोलासारख्या नाय ओ . हेचा तरी समाजला तरी , आमचा घरातसून गेला, लगीन केल्यानं, दोन महिने झाले तरी आमका खबर नाय हुती.
एकुलता याक चेडू, साधा कन्यादान पण नाय करूंक गावला. निदान एका शब्दानं आमका सांगल्यान जरी असता तरी आनंदान लगीन लावून दिलय असतय.नशीब लागता ओ ह्या सगळ्याक. सगळे नाशिबाचे भोग, पोरांचा काय ओ ? तरुण रक्त ता, तेंका वाटता प्रेम केला मगे आयुष्यातला सगळ्यात मोठा काम केला.
ना कधी आवशी- बापाशिक फोन, ना कसली खबर बात. लोका कोण कोण येवन आपली सांगतत तुमचा चेडू दिसलेला हडे इल्ला काय? ……… आणि नातू झालो हा माका पण तोंड नाय बघलंय आजून , मरांदे आता आमचा काय रावला म्हणा.आमच्या फुडें पाटी कोण हा ? घासभर आपला खायचा आणी पडायचा. पण याक हा तुमचा बारक्या वायचं ५ मिनिटा जरी घरात येवन गेला ना काय घर कसा भरल्यासारख्या वाटता.
मरो माझा ह्या असलाच हा बोलत रवलंय काय असोच बोलत रवतंय. बाकी आंबे -फणस काय हाणलास काय नाय येताना? काय नुसती हात हलवीत इलास ? हा हा हा…(मस्करी करत)होय खरा ! सांगाचा रावलाच सोसायटीत ५ किलो साखर आणी डाळ देतत हा, कार्ड घेवन जावा आणी घेवन येवा. मागल्या टायमाक सुद्धा दिल्यांनी पण तुमीच जाग्यावर नाय हुतास.
बरा येतय संध्याकाळी बसाक आता वायचं देव पुजूचो हा संकष्टी हा ना घरवालेचो उपास असतलो आमच्या.
चला ..येतंय …
हे पण वाचा :
नवरा-बायको(मोनोलॉग ) मराठी ऑडिशन स्क्रिप्ट | Acting Audition Script Marathi
(Pro Tips)घर बैठे ऑडिशन कैसे दें-2024 Audition Tips In Hindi
Audition Script in Marathi For Male PDF Free | ऑडिशन स्क्रिप्ट इन मराठी फॉर मेल पीडीएफ फ्री डाउनलोड
आम्हाला फॉलो आणि subscribe नक्की करा :
Tag: Short audition script in marathi for male,Marathi audition script for female,Marathi monologue for male,Marathi Audition script for kids,Audition Script in Hindi for Boy,Best audition script in marathi for male,Audition script in marathi for male pdf.