पुरुषांसाठी कॉमेडी ऑडिशन स्क्रिप्ट | Marathi Audition Comedy Script For Male

पूर्वकल्पना :

एक सेल्समन आहे जो दररोज लोकांच्या घरी जाऊन वेगवेगळ्या वस्तु विकतो, असाच तो एके दिवशी एक घरी आला आणि जोरजोराने आपण सेल्समन असल्याच ओरडू लागला. त्या घरातील एक महिला बाहेर त्याला बघतात आणि तसा तो त्यांच्या जवळ जातो व आपल्याकडील वस्तु त्यांना दाखवायला सुरुवात करतो .

सूचना: हे पात्र करत असताना थोड तोंड थोडस तिरख करून आवाजाचा लाहेजा बदलला तर उत्तम होईल. ही सर्व तुम्ही तुमच्या सोईने करू शकता, मात्र लाहेजा असा पकडावा की जो शेवटपर्यंत टिकवता अला पाहिजे. तसेच ही स्क्रिप्ट कॉमेडी च्या दृष्टीने लिहिण्यात आली आहे तरी मन लावून वाचून त्यातील टायमिंग समजून घ्यावा अन्यथा वाक्याला वेगळा अर्थ लागू शकतो याची काळजी घ्यावी.

पात्र:

सेल्समन ( वय वर्ष ३०-३५ )

वेळ:

१ मिनिट ३० सेकंद

Marathi-Audition-Comedy-Script-For-Male
पुरुषांसाठी कॉमेडी ऑडिशन स्क्रिप्ट | Marathi Audition Comedy Script For Male

Marathi Audition Comedy Script PDF

” वहिनी सेल्समन ” …

नाही नाही ओ तुम्हाला नाही, मी सेल्समन. तुम्ही पण ना, फारच कॉमेडी आहात.

आता तुमच्याच घराबाहेर येऊन मी सेल्समन अशी हाक मारेन का ?

बर मी सेल्समन आहे, मी विकतो….

आ .. इज्जत कशाला विकिन मी, मी वेगवेगळे प्रॉडक्ट्स विकतो. (इज्जत विकायला आलोय मी ?  … इज्जत घ्या इज्जाय ताजी ताजी इज्जत…. (मनातल्या मनात पुटपुटतो ) )
नाही ओ काहीही काय …

एक मिनिट थांबा हा तुम्हाला मी माझ्याकडचे प्रॉडक्ट्स दाखवतो, खरच तुम्हाला आवडतील. आता बघा हे आहे टिकली चिटकवण्याचं स्टॅण्ड. याची खासियत अशी आहे की याच्यामध्ये वेगवेगळ्या टिकल्यांचे आकार आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार योग्य आकारामध्ये टिकली चिटकवू शकता. कसंय ?

बादली आणी आरश्याच मला नका सांगू ओ  (थोडासा चिडून, पण कॉमेडी स्वभावात) हे बघा मी चिडत नाहीये पण बादली आणी आरसा हे पारंपरिक स्टॅण्ड झाल.आमच्यकडच तुम्हाला आधुनिक पद्धतीने बनवलेलं स्टॅण्ड दाखवतोय ना मी.

बर ते राहूदे… हे बघा काय ! आहे की नाही special….  तुम्ही घरी भांडी तर कमीत कमी 3 वेळा तरी घासत असाल.

आ !! नवरा भांडी घासतो ? बर मग तुम्हाला काय तरी माहित असेलच ना कस घासतात ते ?
नाहीच का ? मग काय विकू मी तुम्हाला ?

हे बघा ते राहूदे तुम्हाला काहीतरी विकत घायची इच्छा असेलच ना , म्हणजे घरातली वस्तू , बेन्टेक्स चे दागिने काहीतरी ..मला सांगा लगेच बॅगमधून काढून देतो .

हा हा ..ह  हत्ती …!! हत्ती कुठून काढू?  तुम्ही पण ना . आता काय बॅग मध्ये प्राणी घेऊन फिरतो काय मी . तुला हत्ती घे, सांबर  पाहिजे काय सांबर, वाघवाले …

आता याच्यात हसण्यासारखं काय ?

बर तुम्हाला आंबे देऊ का….
अच्छा ….. मग मागवा आणी खा…..तोपर्यंत नवरा येईल भांडी घासायला …( अस बोलून पळून जातो)

हे पण वाचा :

(सेक्रेटरी) मराठी ऑडिशन स्क्रिप्ट |Marathi Monologue For Male PDF

मशहूर हीरोइन नाम लिस्ट,हिंदी हीरोइन का फोटो साथ ही उनकी असली lifestyle ,struggle ,sucess और उनके sucess होने का मंत्र

Marathi Audition Comedy Script PDF Free Download | मराठी ऑडिशन कॉमेडी स्क्रिप्ट डाउनलोड करा

Marathi-Audition-Comedy-Script-For-Male
Marathi-Audition-Comedy-Script-For-Male
Download Now

आम्हाला फॉलो आणि subscribe नक्की करा :

Instagram

Facebook

Youtube

एक विनंती आहे तुम्ही चुकून जारी आमच्या वेबसाइट वर आला आहात आणि तुम्हाला ही स्क्रिप्ट आवडली तर कमेन्ट करून feedback जरूर द्या तसेच आपल्या फेसबूक,instagram ,यूट्यूब ला follow करा कारण तिथे तुम्हाला खूप कॉमेडी कंटेंट बघायला मिळेल . काही शांखा तसेच काही सुचवायचे असेल तर जरूर आम्हाला संपर्क करा .

Tag: Marathi audition comedy script pdf free download,Marathi audition comedy script in english,Marathi audition comedy script pdf,Marathi audition comedy script for male,Marathi audition script for female,Marathi audition script PDF,Marathi audition script for male,Marathi audition comedy script for girl,comedy script,marathi comedy script,पुरुषांसाठी कॉमेडी ऑडिशन स्क्रिप्ट.

Leave a Comment