नवरा-बायको(मोनोलॉग ) मराठी ऑडिशन स्क्रिप्ट | Acting Audition Script Marathi

पूर्वकल्पना :

इथे एक छोटीशी फॅमिली आहे , ज्या फॅमिली मध्ये एक नवरा आणि एक बायको असा छोटासा संसार आहे. लग्नाला जेमतेम दोन-तीन वर्ष झालेली आहेत. पण जसा जसा वेळ चालला आहे तस तस तिच्या नवऱ्याचं एक वेगळं रूप तिला कळू लागलय . आपला नवरा कुठेतरी वाईट संगतीला लागलाय, त्याचप्रमाणे त्याचे घरात लक्ष नाहीये हे तिच्या लक्षात येऊ लागलय. आज तर काहीतरी अशी गोष्ट घडली जिच्यामुळे पत्नीने नवऱ्याला सोडून जायचा विचार केलेला आहे, आणि त्याचमुळे आज घरात वादविवाद चालू आहे. आता पुढे…… [ नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]

Acting-Audition-Script-Marathi
नवरा-बायको(मोनोलॉग ) मराठी ऑडिशन स्क्रिप्ट | Acting Audition Script Marathi

पात्र :

पत्नी (वय २५ ते ३० वर्ष )

वेळ:

१ मिनिट ३० सेकंद

Acting Audition Script Marathi PDF | ऑडिशन स्क्रिप्ट मराठी

” राघव हे बघ माझा निर्णय झालाय आता कितीही आणि काहीही झालं तरी मी या घरात राहणार नाही .”

नाही नाही चूक तुझी नहिच आहे ना , सगळं माझंच चुकत. प्रत्येक वेळी माझ्यामुळेच भांडण होतात.आज जर रंगे हात पकडला गेला नसतास ना तर असंच चालू राहील असत. काय कमी आहे रे माझ्यात ?..आ. सांग ना काय कमी आहे ? 

लग्नावेळी काय वचनं दिली होती , मी असाच आहे ,तसाच आहे नकासरळ चालणारा म्हणे. 

आधी तर लपून छापून दारू, पार्ट्या ,क्लब .कसबस हे सहन केलं तर याच्यावरच थांबले नाहीत महाराज आता तर बायको नकोशी झालीय.

” तुला त्यादिवशी पण सांगितलंय आणि आता पण सांगते आता बस्स !! ” यापुढे मी हे सहन करू शकत नाही ” तेव्हा माला जाऊदे .कसंय ना तुला पण मार्ग मोकळा ,माझी रोजची कटकट  सुद्धा निघून जाईल .

आणि हो आईबाबांना उत्तर तूच द्यायच बर,  नाही म्हणजे त्यांनाही कळूदे आपली सून घर सोडून का गेलीय ते .

” राघव हात सोड ” …मी म्हटलं हात सोड . अरे बापरे माफी ! नको हा ! कारण तो हक्क तु अधिच गमावून बसलायस ,कळतंय का ? त्यामुळे नको हा केविलवना चेहरा माझ्यासमोर अणूस.

या सध्या भोळ्या, गरीब ,बिचाऱ्या, चेहर्यामागे जो लंपट ,उनाड,बेजबाबदार माणुस लपलाय ना त्याला मि चांगलाच ओळखलाय .घर , परिवार काही आहे कि नाही ? एखाद्याने किती सहन करावं ? 

एकदा मित्र भेटले कि परत घरी जाऊ हा विचारच येत नसेल ना, मी आहे इथे रात्रभर वाट बघत ,आता येईल मग येईल.

मागे एकदा काय माझ्या कॉलेज च्या मित्राने फोन केलेला, तेव्हा अख्ख घर डोक्यावर घेतलेलस तु .काय आठवतंय का? आणि इथे तर सरळ सरळ ,डेटींग  काय ,चॅटिंग काय , डोळ्यादेखत प्रेम उतू चाललंय .

नाही नाही खूप झालं आता माझ्याने सहन करण शक्य नाही .

तुम्हाला जे नाही करायचं ते करा पण मी आता थांबणार नाही .

[ नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]

हे पण वाचा :

(कोकण) मालवणी ऑडिशन स्क्रिप्ट | Audition Script in Marathi(Malvani)

(Pro Tips)घर बैठे ऑडिशन कैसे दें-2023 Audition Tips In Hindi

Acting Audition Script Marathi

Acting Audition Script Marathi For Girl PDF | ऐक्टिंग ऑडिशन स्क्रिप्ट मराठी पीडीएफ़

Acting-Audition-Script-Marathi
Acting-Audition-Script-Marathi
Download Now

Tag: Acting audition script marathi pdf,Acting audition script marathi for girl,Acting audition script marathi for male,Acting audition script marathi for female,Acting audition script marathi for female pdf free download,Acting audition script marathi for female free download.

Leave a Comment