(कोकण) मालवणी ऑडिशन स्क्रिप्ट | Audition Script in Marathi(Malvani)

पूर्वकल्पना :

स्क्रिप्ट चा संदर्भ असा आहे की एक ग्रामीण भागातला शेतकरी आहे , आता या स्क्रिप्ट मध्ये वापरलेली जी भाषा आहे ती कोकणात बोलली जाणारी ‘ मालवणी भाषा ‘ आहे. एकंदर आपण ही स्क्रिप्ट ” कोकणातील शेतकरी “ अश्या प्रकारे सुद्धा सादर करू शकतो. हा जो शेतकरी आहे तो निसर्गचक्राला कंटाळलेला आहे. कधीही पाऊस पडतो, शेतकऱ्यांनी शेती कशी करावी ? , कुटुंब कसं चालवावं ? , अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यामध्ये घुटमळ करतायत. या गावांमध्ये एक वरिष्ठ व्यक्ती आहेत ज्यांचं नाव ‘तात्या ‘आहे, तर हा शेतकरी त्यांची व्यथा घेऊन या वरिष्ठ व्यक्तींकडे गेलेला आहे आणि आपलं मन मोकळं करतोय. आता पुढे ..

Audition-Script-in-Marathi-malvani
(कोकण) मालवणी ऑडिशन स्क्रिप्ट | Audition Script in Marathi(Malvani)

पात्र:

शेतकरी ( ४०-५० वर्ष )

वेळ:

२ मिनिटे

Best Audition Script in Marathi | मराठीमध्ये फ्री ऑडिशन स्क्रिप्ट

” तात्यानू यंदा काय खरा नाय ओ, शेतीत राम रवलो नाय हा. “

साठवलला हुता, नाय हुता तितक्या सगळा पणाक लावला हा . निदान पेरलंला तरी उगावता तरी लय झाला असता.

यंदा पंचायतीतसुन बी-बियाना दिल्यानी, लोकांनी सगळ्यांनी घेतला म्हणान मियाव घीतलय पण कसला काय ? तेनाव फसवल्यान . पावस तसो पीडता, मागल्या २ वर्षा पासून वेळ,काळ सगळा सोडल्यान हा.

मागल्या महिन्यात ती शिबिरावाली बाई इल्ली, ती बोला हुती तुम्ही झाडा तोडतास म्हणान पावस येयत नाय. खरा हा आम्ही झाडा तोडताव पण तेच्या बदल्यात लावताव सुद्धा.

” वर्षानु वर्ष माझो पूर्वज शेती करीत इलो, जंगल वचवल्यान ,गाव जपल्यान ,आपल्या कुटुंबाक बघल्यान , मधल्या मधी पावनो-पैक पण सांभाळल्यान. वेळ ईलीच तर बायकोचा गळ्यातला मंगळसूत्र घाण ठेवल्यान , पण लाचार नाय झालो.
चार पैश्याच्या आशेक कधी आपलो स्वाभिमान विकुक् नाय , तेंका काय जमिनींका गिराइका गावली नसती ? पण नाय तेनी जमिनी विकूक नाय.”

बरा तेच्यात अंगुठोछाप, ना लिवाक येना ना वाचूक येना. आणि हे शिकलेले आता आमका येवन सांगतत झाडा तोडू नुको.
अरे तोडलास तुम्ही, तुमका मातयेची घरा नुको, शेती नुको, गाव नुको, नुसता शहर व्हया. हेन्का कोन्क्रिट चा जंगल व्हया पण आमचा डोंगरातला नुको.

ह्या जर असाच चालू रवला ना तर काय खरा नाय ओ आता हळूहळू गावात माणसा कमी झाली, सकाळी सकाळी किरकिर करणारी पाखरा उडान गेली.

तुमच्या पिढीन जा बघला तेच्यातला चिमुटभर तरी आमका बघुक गावला पण हेच्या फूडच्यानी काय बघायचा ?

काय नाय ओ कोण बोलता नि कोण ऐकता, चला काय गावांदे नाय तर नाय गावांदे आपला काम अपनाक करूंक होया ….येतंय

[ नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]

हे पण वाचा :

महिलांसाठी खास ऑडिशन स्क्रिप्ट | Audition Script in Marathi For Female

बेस्ट ऑडिशन स्क्रिप्ट फॉर मेल |Monologue Script in Marathi

Audition Script in Marathi(Malvani)

Audition Script in Marathi PDF Free Download | फ्री ऑडिशन स्क्रिप्ट मराठी पीडीएफ डाउनलोड करा

Audition-Script-in-Marathi
Audition-Script-in-Marathi
Download Now

Tag: (कोकण) मालवणी ऑडिशन स्क्रिप्ट | Audition Script in Marathi(Malvani), Audition Script in Marathi PDF Free Download,Audition script in marathi for boy, Audition script in marathi for girl, Audition script in marathi for male, Audition script in marathi for students,marathi audition script.

Leave a Comment