Short Audition Script Marathi |मालवणी ऑडिशन स्क्रिप्ट

पूर्वकल्पना :

नमस्कार मित्रानो आज आपण मालवणी भाषेतील एक झणझणीत ऑडिशन स्क्रिप्ट बघणार आहोत ” Short Audition Script Marathi ” एक गावातला माणूस आहे कर्तव्याने सध्या तो त्या गावचा सरपंच आहे , एके दिवशी गावातला एक मुलगा त्याच्या मुलीची छेड काढतो . हे सर्व त्याला कळताच त्या मुलाची खंबर घेण्यासाठी तो त्याच्या घरी जातो . घरी येवून तो त्या मुलाला आणि त्याच्या वडिलांना चांगलाच जाब विचारतो. [ नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]

Short Audition Script Marathi
मालवणी ऑडिशन स्क्रिप्ट | Short Audition Script Marathi

पात्र :

गावातला माणूस ( सरपंच ) वय वर्ष ३०-४०

वेळ :

१ मिनिट ४० सेकंद

Short Audition Script Marathi For Male | शॉर्ट ऑडिशन स्क्रिप्ट मराठी फॉर मेल

” पपल्या तुझ्या झीलाक काय ता सांगान ठेव ” ….

काय झाला ?

” अरे काय झाला म्हणान काय इचारतस . तुझ्या झीलाकच इचार.”

” नाय ना तो नाय सांगाचो , थांब मीच सांगतय. काल भर रस्त्यावर तुझ्या झीलान माझ्या चेडवाचो हात धरल्यान.”

अरे गावचो सरपंच असय मिया , आणि माझ्याबरोबरच जर ह्या असा होवक लागला तर गावातल्या गरीब -सरिबाचा काय ?
नाय नाय हेचो काय तो निर्णय तुका घेवचोच लागतलो आणि तो सुद्धा आजच हयच्या हय. नायतर एकदा काय ह्या प्रकरण माझ्या हाताच्या भायर गेला काय मीच काय देव सुद्धा तुका वाचवुक येवचो नाय .कळला काय ?

ए तु फुडे ये रे… ‘ माझ्या चडवाक काय सोना लागला हा ‘ ? काय तुझ्या घरातली वस्तू हा ती मनात येयत तशी आपल्या मनासारखी वापरायची.

प्रेम बीम म्हटलंस ना तर माझो हात उचलात हा मि अधिच सांगतय, आणि कसला प्रेम रे ? तुझा वय काय .. तु बोलतस काय ..कायतरी वाटाक होया तुका.

स्वतःची चड्डी घेवची तरी अक्कल हा काय आपली , दिवभर 50 रुपयाचा पेट्रोल टाकून गावभर फिरला मगे झाला नाय. आधी दोन दमडे कमवा ,स्वतःचा कायतरी घेवा आणि मगे हे असले धंदे करा.

काय शीरता तरी सांगतय ता ? नायतर ” पालथ्या घड्यार पाणी “.

अरे बापूस दिवसभर लोकांच्या मजुरेक फिरता , तेच्यान झेपत नाय तरी लोकांची कामा करता तेचा वायच कायतरी ठेव.
तेची हाडा ची काडा झाली तरी बिचरो लोकाच्या कामाक जाता.

पपल्या तुझ्याकडे बघून माका गप रवाचा लागता समजला , पोलिसांचा नाव लागला तर आयुष्यभर घरात बसाचा लागात . ” परत कधी माझ्या चेडवाच्या वाटेक हेना जाता कामा नये ” , आणि जर चुकान गेलोच तर माझ्यासारखो वायट कोण नाय समजला .?
चल येतंय मी ..

[ नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]

हे पण वाचा :

पुरुषांसाठी कॉमेडी ऑडिशन स्क्रिप्ट | Marathi Audition Comedy Script For Male

नंबर १ मराठी ऑडिशन स्क्रिप्ट PDF |Marathi Audition Script PDF

Short Audition Script Marathi |मालवणी ऑडिशन स्क्रिप्ट

Short Audition Script Marathi pdf | शॉर्ट ऑडिशन स्क्रिप्ट इन मराठी पीडीएफ

Short-Audition-Script-Marathi
Short-Audition-Script-Marathi
Download Now

Tag: Short audition script marathi pdf, Marathi Audition script PDF, Marathi Audition Script, Monologue In Marathi For Male ,Marathi Audition Script (Monologue) For Male,Marathi audition script for male,Short audition script marathi for girl, Short audition script marathi for male.

Leave a Comment