पूर्वकल्पना :
या स्क्रिप्ट मध्ये आपल्याला एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी दिसत आहे, जी रोज समोरच्या रस्त्याने ये जा करत असते. त्याच रस्त्यावर काही टवाळ मुलं मुलींची छेड काढण्यासाठी उभे असतात. असाच एक मुलगा रोज त्या मुलीला येताना जाताना वाकड्या नजरेने पाहत असतो. रोज सहन करणारी ती मुलगी आज नाविलाजाने त्याला धडा शिकवायच्या उद्देशाने त्याच्या जवळ जाते….. आणि पुढे……(Script For Audition in Marathi For Female) Follow: Whatsapp Channel , Instagram , Facebook , Youtube ]
वेळ:
1 मिनिट 40 सेकंद

मध्यमवर्गीय मुलगी Marathi Audition Script
मुलगी : ए इकडे ये रे …काय आहे , काय सोन लागलय का मला ..हा ? नाही म्हणजे एखात दोन दिवस ठीक आहे ,पण हे तुझं रोजचाच झालंय. कधी मुलगी पहिली नाही का ?
एक मिनिट आज मि तुझं ऐकणार नाहीय बर का , आज मि बोलणार आणि तु फक्त ऐकणार.एरवी तुम्ही मारलेल्या शिट्या, घाण घाण कंमेंट, गाड्यांचे हॉर्न ऐकतो ना आम्ही , तेव्हाच एक ठेवून दिली ना तुमची हिम्मत नाही होणार हे सगळं करायची.
आज तु आहेस उद्या कोणी दुसरा असेल , परवा कोणी तिसरा तुम्ही सुखाने जगू नाही देणार आम्हाला.काय रे उद्या तुझ्या बहिणीला कोणी असा त्रास दिला तर गप्प बसशिल का ?
नाही ना मग आता असं का ? अरे सगळीच मुलं वाईट नसतात पण तुमच्यासारख्या लोकांमुळे त्यांची पण बदनामी होते.हे गाडीवर काय लिहिलंय ? तूच लिहून घेतलंय ना ..आ ? ..वाच हे वाच …अरे ज्यांनी आया बहिणीच्या अब्रू लूटन्यापासुन वचवल्या , ज्यांनी समाज्यासाठी आपल आयुष पणाला लावल त्या महपुरुष्यांचे फोटो, नाव अशी गाड्यांवर लिहून काही होत नसत ते आचरणात आणा. तुमची लायकी नाहीय त्यांची नाव घ्यायची.
काय सॉरी काय ? आता सॉरी म्हटलं कि झालं ? म्हणजे आधी चुक करायची आणि मग सॉरी म्हणायच कि संपला विषय नाही का ? आपल्या एक क्रुत्यामुळे समोरच्यावर त्याचा काय परिणाम होईल याचा विचार कोणी का नाही करत ?
हे बघ आज जे केलास ते शेवटचं उद्यापसुन मीच नाही कुठल्याही मुलीसोबत असं करताना दिसलास ना , सरळ पोलिसात देईन. कळलं ?
Follow: Whatsapp Channel , Instagram , Facebook , Youtube ]
हे पण वाचा:
१) मुलींसाठी स्पेशल ऑडिशन स्क्रिप्ट | Marathi Monologue Script For Female
२)कॉलेज मधील मुलींसाठी ऑडिशन स्क्रिप्ट |Marathi Audition Script For Girl
Script For Audition in Marathi For Female डाउनलोड करा :

Tag: marathi audition script for female,Script For Audition in Marathi For Female,Script For Audition in Marathi For Female ,marathi monologue for female,marathi audition script,script for audition in marathi for female,marathi monologue,dialogues for audition,
Good Script I just imagine that’s girl is me . I feel it emotion and situation . I will just wait for my opportunity 💯😊
Thank you so much for feedback…. All the best.