Comedy Audition Script For Female| कॉमेडी ऑडिशन स्क्रिप्ट फॉर फिमेल

पूर्वकल्पना :

नमस्कार मित्रहो खूप दिवसांनी एक नवीन स्क्रिप्ट तुमच्यासाठी खास “Comedy Audition Script For Female| कॉमेडी ऑडिशन स्क्रिप्ट फॉर फिमेल “ .

सध्या ” चला हवा येऊ द्या “ या मराठमोळ्या विनोदी कार्यक्रमाचे नवीन पर्व सुरू होत आहे आणि त्यानिमित्त सर्वत्र “Chala Hava Yeu Dya” या नव्या कोऱ्या शो साठी ऑडिशन सुरू आहेत. आता आपल्याकडे असे बरेच कलाकार आहेत ज्यांच्याकडे टॅलेंट आहे काहीतरी करण्याची जिद्द आहे पण स्क्रिप्ट न मिळाल्यामुळे ते मागे राहतात. मला सोशल मीडिया वर सुद्धा भरपूर मेसेजेस येतायत की स्क्रिप्ट नाही मिळत. तर मग अशा आपल्या सर्व मित्रांपर्यंत आमची वेबसाइट शेअर करा जेणेकरून त्यांची संधी वाया जाणार नाही.

या स्क्रिप्टमध्ये एक लेडीज आहेत ज्यांना सीरियल बघण्याची खूप आवड आहे. आज जेवण वैगेरे झाल्यानंतर त्या नेहमीप्रमाणे TV Serial बघण्यासाठी येतायत, तर त्याचा नवरा इथे मॅच बघत बसलेला आहे आणि त्या आपल्या नवऱ्याला मॅच चा चॅनेल चेंज करून सीरियल लावा असे सांगत आहे.हा एक comedy monologue आहे जो कुठल्या ही कॉमेडी प्रोजेक्ट च्या ऑडिशन साठी सादर करू शकता.

[ Follow:  Whatsapp Channel , Instagram , Facebook , Youtube ]

पात्र :

मुलगी ,महिला (वय वर्षं साधारण 25-45)

वेळ :

1 मिनिट 30 सेकंद

Comedy-Audition-Script-For-Female
Comedy Audition Script For Female| कॉमेडी ऑडिशन स्क्रिप्ट फॉर फिमेल

Marathi Comedy Audition Script For Female| मराठी कॉमेडी ऑडिशन स्क्रिप्ट फॉर फिमेल

चला चला जेवण झाल आता आपली सिरीयल बघूया…लोकांना जेवण झाल्या झाल्या बडीशेफ लागते , मला सिरीयल लागते.
मालाच कशाला जवळ जवळ सगळ्याच बायकांना हे वेड असते. कसंय ना तसे लोकांना यात खूप सारे तोटे दिसतात वेळ फुकट घालवते, रोजची भांडणंच बघते हे असच ते तसंच पण त्यांना कोण सांगणार या सिरीयल च्या नादात आमची काम दुप्पट वेगाने होतात म्हणून.
तुम्हाला म्हणून सांगते सिरीयल च्या पहिल्या २ भागांच्या मधल्या वेळात माझी भांडी घासून होतात. राहिलेल्या दोन भागांच्या मध्ये मेथीची अख्खी जुडी साफ होते आणि एखादी राहिलीच तर आमचे हे तसही १२ वाजेपर्यंत मॅच बघतच असतात.
आज काय होतय त्या राणीच कुणास ठाऊक ? बिचारी … गरीब गाय  आणि मागे कुणीच नाही म्हणून अशी लोकांच्या दारावर मिळेल ते काम करते आणि ती मालकीण ? मालकीण कुठली कैदाशीन आहे आहे नुसती.(शेवटचं वाक्य जरा जोर देऊन)
काय ओ( जोरात…वरच वाक्य संपताच लगेच…)….काय ओ(थोड घाबरून…  जरा हळू आणि प्रेमाने)…. ती मॅच बंद करा आणि माझी सिरीयल लावा बघू.
काय सेल संपले ?  असे कसे संपले ? तुमचे सेल पण मॅच च्या मध्ये येणाऱ्यनाही व्हर्टाइज सारखे आहेत कधी संपतात ते कळतच नाही.
आता उद्या त्या शेजारच्या मंजुसमोर मी काय तोंड दाखवू,अख्या ग्रुप मध्ये माझा हशा होणार. (थोड रडत)
(समोरून नवऱ्याने कशाला अस म्हटल्याचा आभास..)
कशाला काय कशाला ? आमचा बायकांचा एक ग्रुप आहे आणि  आमच्या ग्रुप मध्ये आम्ही आजच्या सिरीयल च्या आधीच्या भागावरून पुढच्या भागात काय होणार हे ओळखतो आणि जो अचूक ओळखेल त्याला त्यादिवशीचे पाणीपुरीचे पैसे माफ. आता उद्या मला पैसे द्यावे लागणार !
१० रुपयाच्या सेल मुळे मला आता ३० रुपये गमवावे लागतील..तुम्हाला काय माहित ३०रुपए खिशातून गायब करायला काय कष्ट लागतात ते .( थोड्या कमी आवाजात पुटपुटते)…काही नाही काहीं नाही …तुमच्याबद्दल काही नाही…असंच आपलं…(बोलत exit घेते)

[ Follow:  Whatsapp Channel , Instagram , Facebook , Youtube ]

हे पण वाचा:

१) पुरुषांसाठी कॉमेडी ऑडिशन स्क्रिप्ट | Marathi Audition Comedy Script For Male
२)(सेक्रेटरी) मराठी ऑडिशन स्क्रिप्ट |Marathi Monologue For Male PDF

Comedy Audition Script For Female PDF| कॉमेडी ऑडिशन स्क्रिप्ट फॉर फिमेल पीडीएफ

1000036607
Comedy Audition Script For Female
Download Now

Tag:Comedy Audition Script For Female| कॉमेडी ऑडिशन स्क्रिप्ट फॉर फिमेल, कॉमेडी ऑडिशन स्क्रिप्ट मुलींसाठी, funny acting script for girls, मुलींसाठी एकपात्री नाटिका, कॉमेडी मोनोलॉग स्क्रिप्ट, girl comedy natak script, comedy script in marathi female, acting script for female audition, विनोदी ऑडिशन सीन महिला साठी,
marathi monologue for girl audition, funny solo script for female,
drama script female character.

Leave a Comment