नमस्कार , मित्रहो कसे आहात सगळे ? आशा करतो की सगळे मस्त असाल . तर आज तुमच्यासाठी खास स्क्रिप्ट घेऊन आलोय ” Short Marathi Vinodi Natak Script| मराठी एकांकिका pdf ” ; ही स्क्रिप्ट तुम्ही कुठेही तुमच्या आवडीनुसार सादर करी शकता. स्क्रिप्ट पूर्ण वाचा आणि कशी वाटली ते कमेन्ट करून नक्की सांगा. तसेच आपल्या सोशल मेडिया ला फॉलो करून ठेवा.
एकांकिका: “रंगलो प्रेमात मी “
पात्रे:
- नीलम – एक तरुणी, विचारशील, पण थोडी लाजरी.
- श्याम – एक स्वप्नाळू मुलगा, प्रॅक्टिकली जगणारा, थोडा कॉमेडी स्वभावाचा.
स्थळ: एका पार्कमधील शांत कोपरा.
वेळ: संध्याकाळची वेळ.
(नेपथ्यात पक्ष्यांचा किलबिलाट, हलकी वाऱ्याची झुळूक. नीलम एका बाकावर बसलेली आहे, शांततेत काहीतरी विचार करत. श्याम हळूहळू तिच्याकडे येतो.)
Short Marathi Vinodi Natak Script | मराठी नाटक स्क्रिप्ट pdf
श्याम: हाय नीलम! कशी आहेस?
नीलम: हाय श्याम! ठीक आहे. तू कसा आहेस?
श्याम: मी… मी छान आहे. पण… (थोडं थांबून) तुझ्याशी बोलायचंय काहीतरी.
नीलम: हो ना, सांग. इतका गंभीर का दिसतो आहेस?
श्याम: नीलम, आपण खूप वर्षांपासून मित्र आहोत ना?
नीलम: हो, आणि हे विचारण्यासाठी एवढं गोंधळायची गरज आहे का?
श्याम: नाही, म्हणजे… मित्र म्हणून नाही, वेगळं काही बोलायचंय.
नीलम: श्याम, काय चाललंय तुझ्या डोक्यात? स्पष्ट सांग ना.
श्याम: नीलम, मी तुझ्या बद्दल खूप काही विचार केला आहे. मला वाटतं की… मला तुझं प्रेम आहे.
नीलम: काय? श्याम, हे कधी झालं?
श्याम : केव्हाच झालय (स्वताशीच बोलत )
नीलम: काय ?
श्याम: नाही नाही काही नाही , कधी झालं, कसं झालं हे मला कळलंच नाही. पण… तुझ्याशी बोलल्याशिवाय राहवलं नाही. तुझं हसणं, तुझं बोलणं, सगळंच आवडतं मला. एकदा तर तुझ्या घरपर्यंत आलो होतो प्रेमाची कबुली द्यायला, पण ..?
नीलम: पण .. पण काय ?
श्याम: रेडा मध्ये आला ..
नीलम: काय म्हणालास ?
श्याम: तुझ्या भाऊ ग .. तो मध्येच आला, म्हणाला मला चॉकलेट खायचय.
नीलम: मग?
श्याम : मग काय ? गेलो त्याला दुकानात घेऊन …. चॉकलेट च्या नादात माझी कॅटबरी बाजुला राहिली. असो ..
नीलम: श्याम, हे खूप अचानक आहे. मला थोडं समजून घ्यायला वेळ लागेल.
श्याम: मी तुला गोंधळवायचा प्रयत्न नाही करत, पण माझ्या मनातलं सांगणं गरजेचं वाटलं.
नीलम: श्याम, मला तुझी काळजी आहे रे . पण प्रेम म्हणजे काही साधं, सोपं नातं नाही.
श्याम: मला माहितीय नीलम, पण मला वाटतं की आपण एकत्र खूप छान राहू शकतो. मी तुला कधीच दुखावणार नाही. हव तर गणूची शप्पत घेतो.
नीलम: आता हा गणू कोण ?
श्याम: अच्छा गणू .. गणू माझा कुत्रा. त्याच्यावर सुद्धा मी खूप प्रेम करतो, इतक प्रेम करतो की गणू जर मुलगी असता तर तुझ्याआधी मी त्याच्याशीच लग्न केल असत.
नीलम: श्याम, सर्व गोष्टी तु मस्करीत कश्या घेऊ शकतो ? आता प्रेम प्रेम म्हणून इतक्या विश्वासाने बोलतोस, पण प्रेमात काही गोष्टी सहज घडत नाहीत. त्यासाठी वेळ द्यावा लागतो.
श्याम: (थोडा निराश होऊन) म्हणजे… तुला माझं प्रेम मान्य नाही?
नीलम: नाही, असं नाही. पण मला वाटतं की आपण आधी स्वतःचं भविष्य ठरवायला हवं. श्याम, तुला माहिती आहे, मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं आहे.
श्याम : तु कर ना करियर वर लक्ष केंद्रित, मला त्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही, पण एकदा हो म्हण.
नीलम: तुला सीरियसनेस नावाची गोष्टच माहीत नाही वाटत.
श्याम: अस काही नाही हा , मला तुझं स्वप्न माहितीय. आणि मला वाटतं की तुझं स्वप्न पूर्ण करायला मी तुझ्यासोबत आसव. ( थोड मोठेपणा मारत ) अग तुला माहीत नाही लोक प्रेमासाठी काय काय करतात ? प्रेमासाठी लोक लंडन, पाकिस्तानहूंन भारतात येतात, प्रेमासाठी लोक जीव देतात. एक तर सायकल ने जम्मू काश्मीरहून कन्याकुमारीला गेला होता. असो मी लोकल मध्ये बिना टिकिट चा प्रवास करून आलोय ग, निदान तेवढा तरी माझा त्याग समजून घे.TC ने पकडला असता तर माझ्या त्यागावर कायमचा स्टॅम्प बसला असता.
नीलम: काय म्हणालास ?
श्याम: काही नाही…
नीलम: तू काही ऐकणार नाहीस .. हे बघ तु खरंच खूप चांगला मित्र आहेस. पण मला वेळ हवा आहे हे सगळं समजून घेण्यासाठी.
श्याम: (थोडं आनंदाने) म्हणजे, अजूनही काहीतरी आशा आहे? हे नाचो रे .. ढोल बाजे ढोल बाजे ढोल बाजे ढोल .. ढंम ढंम बाजे ढोल … ….. ……ए तुमच काय रे ? चल एथून .. मी काय शो लावलाय जमा झालात ते. ( थोडा लाजत .. पार्क मधील लोकांना हकलावत )
नीलम: माणसामध्ये एवढा वेडेपणा बारा नव्हे, बर का ? एकतर लोक तुला वेडा ठरवून मोकळे होतील किवा मग तुझ्याबरोबर माझाही नंबर लागेल. बस इथे बाजूला.
श्याम : काय करणार आता ? हा वेडेपणा जन्मतःच माझ्यात आलाय. माझे बाबाही असेच आहेत , एकदम मनमोकळे; म्हणजे कोणाच्या मागून बोलणार नाही जे काय आहे ते सरळ तोंडावर, हा मग समोरच्याला कधी कधी वाईट वाटतं, ठीक आहे ना. आपण कुणाला तरी त्याच्या मागून बोलतो, आपल्याला तेव्हा काही वाटत नाही पण मग तीच गोष्ट कुणा तिसऱ्या व्यक्तीकडून त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते आणि मग त्या व्यक्तीच्या नजरेत आपण उतरतो. मग परत ते स्वतःला गिलटी वाटून घेणे, पश्चाताप होण, कशाला हव हे सर्व त्यापेक्षा जे आहे ते बोलून टाकावं. आता लोक आपल्याला वेड ठरवतात की शहाणा हे कम्प्लीटली त्यांच्या विचारसरणीवर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांच्यावर जास्त लक्ष द्यायचं नाही आपल्याला जे वाटतं ते आपण करायचं.
नीलम: बापरे .. ही वाक्य तुझ्या तोंडी शोभत नाहीत, केवढा तो भाबडेपणा, आणि हो तु काय आहेस ना ते मला चांगलच ठाऊक आहे. कळल.
श्याम: हो हो , एवढीच जर शाहाणी असतीस तर आता एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या पोस्ट ला असतीस. बर ते जाऊदे मी माझ कोटेशन अप्रूव झाल अस समजू का ?
*****अॅक्टिंग सुधारण्यासाठी पुस्तक : ” मराठी नाटक आणि रंगभूमि “*****
नीलम: मी अजून हो म्हटलेल नाही आहे कळल ?
श्याम : मग आता म्हण..
नीलम: ए नाही हा.. मला थोडा वेळ हवाय आणि तुला तोवर वाट बघावी लागेल.
श्याम: बर .. मी तुझी वाट बघायला तयार आहे. फक्त एक वचन दे, आपण तु मला कधीच सोडून जाणार नाहीस.
नीलम: हो मी वचन देते की मी तुला सोडून जाणार नाही.. पण लक्षात ठेव अजूनही officially मी होकार नाही दिलाय.
श्याम: देवा म्हणजे मी नक्की काय समजायच , धड हा “हो” नाही, पण “नाही” ही नाही!
नीलम: (हसून) तू तसंच म्हणू शकतोस!
(दोघेही हसतात…..संध्याकाळचा प्रकाश हळूहळू मंदावतो.)
पडदा पडतो.
[ नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]
हे सुद्धा वाचा:
Ekankika Script in Marathi(Audition )| मराठी एकांकिका स्क्रिप्ट
Audition Script in Marathi| मराठी ऑडिशन स्क्रिप्ट
Short Marathi Vinodi Natak Script PDF Free| शॉर्ट मराठी विनोदी नाटक स्क्रिप्ट पीडीएफ फ्री
Tag: short marathi vinodi natak script,drama script in marathi,marathi natak pdf free download,मराठी एकांकिका pdf,audition script marathi,marathi serial audition whatsapp group link,natak script in marathi,marathi natak script,मराठी नाटक स्क्रिप्ट pdf,marathi ekankika script.ekankika script in marathi.