पूर्वकल्पना:
नमस्कार मित्रहो आज तुमच्यासाठी नवीन स्क्रिप्ट घेऊन आलो आहे ” Comedy Script in Marathi |कॉमेडी स्क्रिप्ट इन मराठी “ ; इथे एक व्यक्ति आहे तो त्याला पोलिसानी अरेस्ट करून पोलिस स्टेशन ला आणलेल आहे. संबधित व्यक्ति पहिला भाईगिरी करत असल्यामुळे पोलिसाना त्याचा संशय आला आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे , आता त्याला एथे का आणलेला आहे ? हे तुम्हाला स्क्रिप्ट वाचल्यावर संपूर्ण लक्षात येईल. ..
सर्वाना एक विनंती आहे की खाली दिलेल्या ” सोशल मेडिया ” ला लगेच subcribe , follow करून ठेवा कारण नवनवीन अपडेट त्या ठिकाणी दररोज केले जातात. so प्लीज लगेच आम्हाला जॉइन व्हा. तसेच कमेन्ट करून feedback नक्की शेअर करा.
पात्र :
भाईगिरी करणार व्यक्ति ( भाई वय वर्ष ४० )
वेळ :
१ मिनिट ३० सेकंद
Short Comedy Script in Marathi For Audition | शॉर्ट कॉमेडी स्क्रिप्ट इन मराठी फॉर ऑडिशन
ओ साहेब …आपल्याला इकडं का आणलाय ? काय लोचा झाला आहे काय ? नाय. …मग काय मॅटर, लपडा, झगडा, खुन, हाणामारी …पण आपण तर काय केलेलाच नाय. तसा पण काय असल तर सांगा आपण मॅटर सलटवून टाकतो ना.
नाय नाय साहेब तस नाय …तुम्हाला शप्पत घेऊन सांगतो आपण आता त्या धंध्यात नाय हाय, आपण कधीच सोडलाय सगळा. आता कुठेतरी पोरांनी काय लपडा केला असेल, पण आपला त्याच्याशी कायचं संबंध नाय.
तुम्हाला सांगतो मागच्या टायमाला जेलमधुन बाहेर आल्यावर आपल्या आय न आपल्याकडन वचन घेतलाय का हे सगळ सोडुंन द्यायचं.तेव्हापासून हा धंधा, भाईगिरी , पंटर, चमचे, गोटी,वाट्या सगळं सोडलाय ओ.
(एक कानाखाली बसल्याची ऍक्टिंग) साहेब आता कशाला मारलं ?…….अच्छा चमचा गोटी काय ..ते बोलता बोलता निघून गेला, ते काय हाय आपला करिअर सगळा हेच्यामध्येच गेला ना तर आता सवय झाली हाय. नाय पण मी थोडी थोडी “सुध्द मराटी ” शिकतोय हा. हा हा तेच “शुद्ध मराठी” .
आपला तो थोडा “प्रॉन्सेशन ” (प्रोणाउन्सेशन) चा थोडा प्रॉब्लमच हाय, तेच्यामुळे आपण काय बोलतो ते समोरच्याला किलरच होत नाय.
आपण काय बोलतो सोडा ना, आपल्याला उगाच कोणीतरी अडकवायला ट्राय मारतो हाय. आता बघा आपल्याला जर लफडा करायचाच होता तर आपण नंतर एरियात थांबलो असतो काय , सगळा बंदोबस्त करून कधीच वंटास झाला असता.
मागच्या टायमाचं तुम्हाला खबर हाय ना ते राजवाटी साहेब इन्स्पेक्टर होते त्या येळेला.अख्खा एरिया पिंजून काढला होता पण आपण भेटला नव्हता. नंतरच्याला ते apposit गँग ने माती खाल्ली त्यामुळे आपण फसला.
********** अॅक्टिंग शिकण्यासाठी उत्तम पुस्तक : ” मराठी नाटक आणि रंगभूमि ” ****************
आपल्याला काय वाट्टो तो oppsite गँग वाला “सम्या सुपारी” हाय ना त्यानेच कायतरी गेम केलाय, साहेब आपल्याला जाऊ दे ना .आपली फॅमिली वाट बघत असलं .हे बघा ना संडासच्या बदलीसकट आपल्याला उचललाय.
[ नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]
हे सुद्धा वाचा :
Male Monologues For Auditions | ऑडिशन मोनोलॉग फॉर मेल
(2024)Children’s Monologues For Auditions in Marathi | ऑडिशन स्क्रिप्ट फॉर चिल्ड्रेन
Comedy Script in Marathi PDF Free| कॉमेडी स्क्रिप्ट इन मराठी पीडीएफ फ्री
Tag: Comedy Script in Marathi |कॉमेडी स्क्रिप्ट इन मराठी (ऑडिशन ), Short comedy script in marathi, Comedy script in marathi pdf download, Best comedy script in marathi, comedy anchoring script in marathi, comedy act script in marathi, comedy drama script in marathi pdf free,comedy skit script in marathi,marathi audition script.
कृपया मला शालेय विद्यार्थ्यांचे स्वप्न किंवा मुलांशी निगडीत स्वप्न या विषयावर नाटक स्क्रिप्ट मिळू शकेल का?
नमस्कार मॅडम, कमेन्ट केल्याबद्दल धन्यवाद .. डिटेल्स पाठवलात तर नक्की प्रयत्न करतो. नीट सर्व डिटेल्स पाठवा विषय, पात्र संख्या( मूल/मुली ), वेळ, अंतिम तारीख.