२ Patri Natak Script in Marathi(Audition )| दोन पात्री नाटक स्क्रिप्ट इन मराठी

पूर्वकल्पना :

हॅलो मित्रमंडळी कसे आहात सगळे ?? आजची नवीन स्क्रिप्ट खास तुमच्यासाठी ” २ Patri Natak Script in Marathi| दोन पात्री नाटक स्क्रिप्ट इन मराठी “, आपल्या आजच्या स्क्रिप्ट मध्ये एक सासू-सुनेचा संवाद आहे. इथे सुमीला तिच्या नावऱ्याबद्दल काहीतरी अश्या गोष्टी कळतात की ज्यावर ती सहज विश्वास ठेऊ शकत नव्हती, आणि या गोष्टी तिला दुसरी-तिसरीकडून नाही तर तिच्या जिवाभावाच्या मैत्रिणिकडून म्हणजे ” अंजी ” कडून समजतात.

सर्व ऐकून ती नाराज असते आणि तिची सासू तिला समजावण्याचा प्रयत्न करते. चला तर मग सासू आणि सुनेचा संवाद ऐकुया .. आमच्याशी कनेक्ट राहण्यासाठी ..[नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]

पात्र :

सासू ( वय वर्ष ४०-५५ ) सून (सुमी) वय वर्ष २५-३५

वेळ :

3 मिनिटे

2-patri-Natak-Script-in-Marathi
२ Patri Natak Script in Marathi| दोन पात्री नाटक स्क्रिप्ट इन मराठी

Natak Script in Marathi | नाटक स्क्रिप्ट इन मराठी

सासु: आग सुमे कंच्या बी बाईसाठी नवरा ह्यो देवासारखा 
असतुया बघ किती अन कसा बी असला तरी त्यो आपला माणूस असतो.

सुमी: आव सासूबाई म्या ह्यास्नी वाईट बोल न्हाय लावत हाय पर एक बायको म्हणून माझ्या बी कायतरी अपेक्षा हायतच की.

सासु: अग व्हय की म्या कुठ नाय म्हणायलेय तु जे बी बोलतीस ते समदं मला पटतया पर कुणाच्यातरी सांगण्यावरन हे अस डोचक्यात काय बी भरून घेन कितपत योग्य हाय ? अन ते खर हाय का खोट ह्याचा बी पत्या न्हाय.

सुमी: सासूबाई वाईच ऐका की “अंजी” मायासंगट खोट न्हाय वागायची, जीव देईल पर आपल्या माणसाला तरास व्हइल अस कधी बी वागणार न्हाय.

सासु:  आग पर…..

सुमी: सासूबाई…मला आता खर खोट केल्याबिगर झोप न्हाय लागायची; तवा हे जवर घरला येत न्हाय तवर म्या वाट बघीन.

सासु: अग पर असा राग डोचक्यात घालून आजवर कुणाचं बी भलं न्हाय झालय उलट यांनच लोकांचे संसार बरबाद झालेत, तवा आपण समदे बसू अन बोलू .

सुमी: (घाबरत..) सासूबाई मला तर लई भ्या वाटायलंय.  म्हंजी हे समदं जर खर असल तर माझा बी संसार मोडल ? माझी समदी सप्न पान्यात जात्याल ?

सासु:  आग पोरी आस न्हाय बोलायच , तुला माग बी सांगितलंय असलं काय बी वंगाळ इचार करू नगस पर न्हाय तु काय आपलं सोडत न्हाय. तु अस काय बी इचार करत बसतिस अन तुला अस बघून घराबाहेर गेल्यावर माझा बी जीव लागत न्हाय बघ.
हे बघ मला ठावं हाय पोरीच्या जातीला किती संकटातून जावं लागतया. सवताच्या आई-बा ला सोडून नईन माणसांबरोबर राहाया लागतंय, मनात नसून बी समदं सहन कराया लागतंय. आम्ही बी या समद्यातून आलोय बघ म्हणून तुला सांगायलोय वाईच धीर धर . तुला अस वाटत असलं ना की म्या माया पोराच्या बाजूने बोलतेय तर तस न्हाय हा . मला माझा पोरगा जितका तितकीच अन त्याच्याबी वर तु हायस. आता कळतंय ना म्या काय म्हणती ते का उगा मला बोलाया लावून तु तिकड मजा घेतीस. (थोड काळजी करत आणि माग थोडीशी गंम्मत करत)

सुमी: सासूबाई..खरच त्यानं कपाळावर लिवताना तुमच्यासारखी माया लावणारी माणस माझ्या पदरात टाकली तेच म्या माझं नशीब समजते. लग्नाच्या येळेला  मला तर लई भ्या वाटलेलं माणस कशी असत्याल? मला समजून घेत्याला की न्हाय पर आय- बा वर ईश्वास ठेवला अन समदं बर झाल बघा. मला तुमच्यकडनं येक वचन हवंय तुम्ही मला कधी बी परक न्हाय करणार.
सासु: हे पाय ” अंजी” तुझी जिवाभावाची मैतर हाय हे ठावं हाय अमासनी पर तीन सांगितलेलं समदं खरच असलं याच्यावर माझा तर ईश्वास न्हाय बघ. मागल्या टायमाला बी असच काय बी बरळली व्हती अन आपल्या घरात भांडण व्हता व्हता राहिलीत. ते काय बी न्हाय तु काय ऐकलं न्हाय अन तीन काय सांगितलं न्हाय, कळतंय म्या काय म्हणायलोय ?

सुमी: व्हय तुमचं बरोबर हाय उगा मी काय बी इचार करायचे अन भलतंच व्हायचं, ते आले का त्यांच्याकडनंच काय ते खर खोट करून घेते उगा मनाला घोर नग.

[नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]

हे सुद्धा वाचा:

Monoact Script in Marathi | मोनोअॅक्ट स्क्रिप्ट इन मराठी

Script For Audition in Marathi For Female| महिलांसाठी मराठी ऑडिशन स्क्रिप्ट

2 patri Natak Script in Marathi

२ Patri Natak Script in Marathi Download Free | दोन पात्री नाटक स्क्रिप्ट इन मराठी फ्री

2-patri-Natak-Script-in-Marathi
2 patri Natak Script in Marathi
Download Now

Tag: २ Patri Natak Script in Marathi, marathi ekpatri script pdf, ekpatri natak script in marathi pdf,marathi serial audition whatsapp group link,marathi ekankika script pdf free download,Ekpatri Natak Script in Marathi,एकपात्री नाटक,Ekpatri Marathi Natake,natak script in marathi,natak script in marathi download,marathi audition script.

Leave a Comment