पूर्वकल्पना :
नमस्कार मित्रहो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एक अजून एक स्क्रिप्ट ” Marathi Language Marathi Natak Script|मराठी लॅंगवेज नाटक स्क्रिप्ट “ ; इथे एक मुलगा आहे जो आपल्या गुरूंकडे अॅक्टिंग शिकत आहे.
मुलगा थोडा रुसलेला आहे …त्याला कुठेतरी ऑडिशन साठी जायचं होत आणि त्याचा गुरु त्याला जाऊ देत नाहीत …
तो स्टेजवर इकडे तिकडे फेऱ्या मारत आहे ..तिकडून त्याचे गुरु येतात…त्यांना बघून तोंड फिरवून..थोडा नाराज…गुरु दोन्ही हात पाठीमागे बांधून येतात. ..[नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]
पात्र :
मुलगा (वय वर्ष २०) ….शिक्षक (अभिनयाचे गुरु/वय वर्ष ३०-५०)
वेळ :
५ मिनिटे
Marathi Language Marathi Natak Script For Students| मराठी लॅंगवेज स्क्रिप्ट फॉर स्टूडेंट्स
शिक्षक: शांतता….शांतता… शांतता खरंच कधी कधी खायला
उठते ही शांतता.
मुलगा: कशाला आलात?
शिक्षक: काय आहे… शांततेची सवय नाही आहे एवढी.
मुलगा: ह ह.(स्मितहस्य)…मग ती निर्माण होण्याचं कारण स्वतः
बनू नये.
शिक्षक: म्हणजे …नक्की काय म्हणायचं आहे तुला.
मुलगा: हेच की शांतता स्वतःच निर्माण करायची आणि नंतर
स्वतःच त्याची कारण शोधत बसायची.
शिक्षक : तुला वाटत नाही की तु अपेक्षेपेक्षा जरा जास्तच
बोलतोयस.
मुलगा: मी आणि अपक्षेपेक्षा जास्त…. आमच कुणी ऐकून
घेतलं तर अपेक्षेपेक्षा जास्त होईल …
शिक्षक: अस काय आहे जे आमच्या कानापर्यंत आल आणि
आम्ही मद्दाम ते ऐकलं नाही.
मुलगा: घ्या ….आता कानाबरोबर बुद्धी चाही विसर पडायला
लागलाय बहुतेक….सांगतो…सगळ काही नीट आणि
विस्कटून सांगतो म्हणजे कळेल.
तुम्ही खरंच जर माझे गुरु असता तर हे असे शिष्याबद्दल
वाईट वागला नसता. काल मी तुमच्याकडे एका
गोष्टीसाठी विचारणा केली होती त्याच उत्तर मला
नकारार्थी अपेक्षित नव्हतं. किती चांगल्या मनाने मी
आलो होतो , वाटलं होत समोरून शाबासकीची थाप
मिळेल पण नाही दुसऱ्याच भलं बघवत नसेल तर
आपण तरी काय करणार म्हणा. मग अश्या माणसाने
स्वतःला गुरु म्हणून घेणे कितपत योग्य ?.
शिक्षक: (स्मित हास्य).. अच्छा … म्हणजे आता तु आजून
कालच्या गोष्टीवर अडकून बसलायस. अरे कालच
काल सोडून द्याव आज काहीतरी नवीन शिकव, इतकं
सोप्प आहे ते, अरे अभिनयात जर पारंगत व्हायचं
असेल तर नटाने सतत नावीन्य शोधायला हवं.
मुलगा : सर पण कालच ऑडिशन हे माझ्यासाठी खूप महत्वाचं
होत आणि हे तुम्हालाही माहिती आहे. काहीतरी चांगल
सुद्धा घडू शकलं असत.
शिक्षक: हे बघ एका शिष्याची पात्रता त्याच्या गुरुपेक्षा दूसर
कोणीही समजू शकत नाही. हा आता वेगवेगळ्या
क्षेत्रात गुरु हा वेगळा असतो मात्र त्याच उद्दिष्ट
एकच ,आपल्या शिष्याला योग्य ती दिशा दाखवण.
मुलगा: तुम्ही विषयांतर करताय…माझा मुद्दा इतकाच होता की
मला तुम्ही ऑडिशन ला जाण्यापासून थांबवायला नको
होत.
शिक्षक: एक एक ..एक मिनिट …माला आधी सांग तुला
माझ्याकडे येऊन किती दिवस झाले.सांग ना तुला
एकंदर अभिनयाचा किती अनुभव आहे?
मुलगा: ३ आठवडे …
शिक्षक: जेमतेम 3 आठवडे….आता या तीन आठवड्यात तुला
वाटतं की तु संपूर्ण अभिनय शिकलायस…. नको
नको …वाटत कशाला आपण परीक्षाच घेऊ
त्यापेक्षा..मान्य असेल तर बघ .. मी तुझी छोटीशी
परीक्षा घेतो..जर तु परिपक्व असशील तर माझी
काहीच हरकत नाही. थोड्या वेळासाठी समज की तुझ
ऑडिशन इथेच आहे.
मुलगा : हो ..चालेल…पण जर ही परीक्षा मी पास झालो तर
मात्र तुम्हाला तुमचा निर्णय बदलावा लागेल.
शिक्षक : आम्हाला मान्य आहे. …बर आता मी एक वाक्य देतो
ते तु जसच्या तस सादर करायची , हा आता
अगदीच जमत नसेल तर तु तुझ्या पद्धतीने करू
शकतोस.
मुलगा : तुम्ही देऊन तर बघा ….कस फाड फाड बोलतो ते.
शिक्षक: बर तर ऐक… ” आमच्या असंख्य कोसांवर पसरलेल्या
या राज्याच्या सिमा ओलांडून राज्यात प्रवेश करण
म्हणजे मृत्यूला समोरून आमंत्रण देण हे ठाऊक
असताना सुद्धा कुणी अनोळखी व्यक्ती आमच्या
अनुपस्थितीत चहू बाजूनी चोख पहारा असलेल्या
आमच्या राजमहालाच्या पूर्वेकडील दालनातिल
वडिलोपार्जित संपत्तीमधिल आईसाहेबांचा मोतिहार
स्वतःच्या नाजूक हस्तानी अलगद उचलून आमच्या
राजमहालाच्या बाहेर सुखरूप निघून जातो हे आमच
क्षत्रिय असण्याच दुर्भाग्य नव्हे तर अन्य काय ? “
चल बोल …मी आता हे एकच वाक्य दिलंय तेवढच
बोलून दाखव.
मुलगा : (ऐकून घाबरतो)….पाणी मिळेल..? नाही म्हणजे
वाक्यच एवढं आहे की बोलता बोलता सहज तहान
लागेल म्हणून म्हटलं थोड पाणी पितो आणि बोलतो.
(घाबरत सुरु करतो) आमच्या राज्याच्या सिमा….या
मृत्यूला आमंत्रण देणाऱ्या
असून ….मग…राजमहालाच्या …
शिक्षक : बस बस…मला मिळालं माझ्या पहिल्या प्रश्नच उत्तर.
लांबलचक,पल्लेदार वाक्यांचा वर्षाव जर सहजपने
आणि न चुकता करायचा असेल तर वाचनाशिवाय
पर्याय नाही.
मुलगा : मी ते व्हाट्सअपवर्….
शिक्षक : व्हाट्सअँप वरच्या 1 मिनिटाच्या मेसेज ला वाचन
म्हणत नाही हे मी आधीहि सांगितलंय आणि आत्ताही
सांगतोय. मोठमोठे लेखक,साहित्यकार यांचा वारसा
आपल्या मराठी साहित्याला आहे, त्यांची पुस्तक
वाचा,कादंबर्या वाचा.त्याशिवाय भाषा सुधारणे शक्य
नाही.
मला सांग अभिनयामधील रस कोणते आहेत?
मुलगा : शृंगार,हास्य,करुण, रौद्र,वीर,भयानक, बिभत्स….
शिक्षक: छान. ..आता मला “करुण” ह्या रसाबद्दल थोड सांग.
सांगता येत नसेल तर नसेल तर असूदे . निदान
अभिनयाचे प्रकार तरी ….? काही आलय का
वाचनामध्ये …आंगिक, वाचिक,आहार्य ,सात्विक…
मुलगा: नाही मला नाही माहित याबद्दल काहीच…
शिक्षक: असो …जाऊदे जे माहित नाही ते राहूदे आता शेवटचा
प्रश्न विचारतो पण याचं उत्तर मात्र तुला द्यावंच लागेल .
आपण कुठलाहि कार्यक्रम रंगमंचावर सादर करतो ,मग
प्रत्येक वेळी त्याच स्वरूप हे वेगवेगळ असू शकत.
समज मी आत्ता ” रंगमंचाची व्याख्या” विचारली तर
काय सांगशील?
मुलगा : (पायावर डोक ठेवतो) मला माफ करा…खरंच मला
माफ कर. पैसा, प्रसिद्धी ,नाव या सर्व गोष्टींनी मला
इतकं आंधळं कि माझ्या आजूबाजूच्या माणसांवर मी
संशय घेतला.
शिक्षक: आता कळलं का मी का नकार दिला होता. बाळा
अभिनय हा समुद्र आहे ज्यामधील जेवढं आपलंस
करशील तेवढं कमीच. त्यामुळे एक लक्षात् ठेव
अभिनय ही एक अशी कला आहे जी प्रत्येकाकडे
असते . शिक्षक शिकवण्याचा अभिनय करतो,विद्यार्थी
अध्ययन करण्याचा तर कोणी आपापल्या क्षेत्रात
अभिनय करत असतो; आणि त्यामुळे शिक्षकाच आणि
अभिनयाच एक घट्ट नात आहे.
[नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]
हे सुद्धा वाचा:
Monoact Script in Marathi | मोनोअॅक्ट स्क्रिप्ट इन मराठी
Script For Audition in Marathi For Female| महिलांसाठी मराठी ऑडिशन स्क्रिप्ट
Marathi Language Marathi Natak Script PDF Free Download | मराठी लॅंगवेज मराठी नाटक स्क्रिप्ट पीडीएफ फ्री डाउनलोड
Tag: Marathi Language Marathi Natak Script|मराठी लॅंगवेज नाटक स्क्रिप्ट, Marathi language marathi natak script pdf free download, Marathi language marathi natak script pdf, Marathi language marathi natak script for students, monoact script in marathi, marathi comedy natak script pdf download, marathi bal natak script pdf.