Comedy Monologue Script in Marathi | मराठी कॉमेडी मोनोलॉग स्क्रिप्ट

पूर्वकल्पना :

नमस्कार मित्रहो आज आपण तुमच्यासाठी फूल कॉमेडी, धमाल, एंटरटेंमेंट स्क्रिप्ट घेऊन आलोय ” Comedy Monologue Script in Marathi | मराठी कॉमेडी मोनोलॉग स्क्रिप्ट ” ; इथे एक अॅक्टर आहे ज्याला शूटिंगसाठी बोलवलेल आहे, आणि त्यामुळे तो व्यक्ति सेटवर येऊन पोहोचलेला आहे. तिथे उपस्थित एक व्यक्तीला तो हाक मरतो आणि विचारपूस करतो. या दोघांच संभाषण थोड वेगळच आणि विनोदी स्वरूपाच आहे.

हे पात्र सादर करत असताना, त्या पात्राचा टाइमिंग समजून घेऊन सादरीकरण कारण गरजेच आहे अन्यथा ते वेगळ आणि नॉर्मल वाटण्याची शक्यता आहे. आवाजातील चढ-उतार नीट समजून घेण आवश्यक आहे. [ नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]

पात्र :

वय वर्ष २५-४५ (इतर सुद्धा सादर करू शकतात )

वेळ :

१ मिनिट ५० सेकंद

Comedy-Monologue-Script
Comedy Monologue Script in Marathi | मराठी कॉमेडी मोनोलॉग स्क्रिप्ट

Comedic Monologues Script for Men | कॉमेडी मोनोलॉग स्क्रिप्ट फॉर मेन

हाय…हेल्लो…एक्स क्यूज मी ” व्यंकटेश बजरंगराव मिशीवरकर ” ?( त्यांच्याकडे बघत ) …… नाही नाही ओ मिशी नका वर करू, मी नाव विचारलं . तुमचं…. नाव आहे ना ” व्यंकटेश बजरंगराव मिशीवरकर “, म्हणजे मला तरी मेसेजवर हेच आल होत. एक विचारू….हे तुमचं नाव साऊथ इंडियन, मधलं नाव एकदम कोल्हापुरी स्टाईल, आणि आडनाव तर अजून ओळखताच आलेलं नाही आहे. म्हणजे हे नाव जाणून बुजून ठेवल की तुमची … (खाजवल्याची ऍक्टिंग करतो.. थोडक्यात तुमची खाज अस म्हणायच असल्यासारख ). नाही नाही म्हणजे तुमचं नाव युनिक आहे एकदम म्हणून विचारलं.

हे अजून एक, ” तुमच्या असिस्टंट ला मी मेसेज केला की डायरेक्टर कोण आहेत त्यांचं नाव सांगा आणि काही प्रॉपर्टी मला बरोबर कॅरी करायची आहे का ” आता इथे त्याने दोन्ही प्रश्नांची उत्तर देण स्वाभाविक आहे की नाही, परंतु नाही त्याने एकाच प्रश्नाच उत्तर दिलय हे बघा ” Mis.Shree ” .आता मला सांगा फक्त प्रॉपर्टी सांगितली म्हणून मी हे मिश्री(मशेरी) च पाकिट घेऊन आलोय पण डायरेक्टर च नाव सुद्धा सांगितला असत तर बर झाल असत.

अच्छा अस आहे तर म्हणजे डायरेक्टर च नाव ” मिस श्री ” , मग हे मिश्री च पाकिट फुकट गेल तर. काहीही असो पण त्याने काहीतरी टायपिंग मिस्टेक केली होती म्हणून तर एवढा मोठा गोधळ झाला, हे असिस्टंट असतातच असे काम सिरिअसली घेतच नाहीत.

हा आता लक्षात आल माझ्या काल गटारी होती आणि त्यात रात्री मेसेज केला. हा मेसेज बघा काय आहे हे ” Mis .Shree ” . अरे बापरे इथे तर बरोबर आहे. कदाचित काल माझीच गटारी होती.

बाय द वे … मी ऍक्टर आहे .नाही नाही ओ डॉक्टर बाहेर, आता ऍक्टर आहे. कसय मी बाहेर डॉक्टरकी करतो पण इथे ऍक्टरकी …आपलं हे …ऍक्टर आहे. त्याच झाल काय मी आधी छोटे मोठे रोल करायचो. एकदा काय झाल एका सिरीयल मध्ये मला साईड डॉक्टर ची भूमिका मिळाली होती. तुमच्या स्टेजवर कसा साईड डान्सर असतो तसा आमच्या सिरीयल मध्ये साईड डॉक्टर होता.
सिरीयल आज संपेल, उद्या संपेल पण नाही सलग 7 वर्ष ती सिरीयल चालली आणि मग तो डॉक्टर माझ्या मनात इतका भरला की मी बाहेर माझं क्लीनिक सुरु केलेलं आहे. सेटवर प्रॅक्टिस करायचो संध्याकाळी क्लीनिक मध्ये जाऊन इंजेकशन द्यायचो. थोडक्यात मी ऍक्टर आहे.

हे पण वाचा:

Marathi Monologue Script For Audition| मराठी मोनोलॉग स्क्रिप्ट

Marathi Natak Script PDF Free Download | दोन पात्री ऑडिशन स्क्रिप्ट

Comedy Monologue Script PDF Free | कॉमेडी मोनोलॉग स्क्रिप्ट पीडीएफ फ्री

Comedy-Monologue-Script
Comedy-Monologue-Script
Download Now

Tag: Comedy Monologue Script in Marathi | मराठी कॉमेडी मोनोलॉग स्क्रिप्ट, Comedy monologue script pdf, Comedy Monologue Script in Hindi, Short comedy monologue script, Comedy monologues for teens, Comedic monologues for men, Comedy monologues from movies, marathiauditionscript.

Leave a Comment