पूर्वकल्पना :
दररोज सारखी आजही तुमच्यासाठी खास ऑडिशन स्क्रिप्ट घेऊन आलोय. Marathi Natak Script For Students(Audition) , या स्क्रिप्ट मध्ये तुम्हाला एक मुलगी आणि एक मुलगा दिसत आहे. दोघेही कॉलेज मध्ये शिकत आहेत आणि एकमेकांवर जिवापाड प्रेम करतात. ते दोघेही आज एक ठिकाणी भेटायला आलेले आहेत आणि आपली भविष्यातील गोष्टीबद्दल गप्पागोष्टी करत आहेत. [हमे फॉलो करे( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]
पात्र:
मुलगी (वय वर्ष २०)
वेळ:
१ मिनिट ३० सेकंद
Best Marathi Natak Script For Students Audition | बेस्ट मराठी नाटक स्क्रिप्ट फॉर ऑडिशन
ए चल हा …तुझ आपलं काहीतरीच एवढी पण सुंदर नाही आहे मी .उगाच तु हर्बऱ्याच्या झाडावर चढवू नकोस. मला नाही कळत की आपण एवढे आनंदी का असतो ? म्हणजे तु माझ्या आयुष्यात आलास म्हणून की मी तुझ्या आयुष्यात आले म्हणून ? आपण आहे ना छोट्या मोठ्या गोष्टी एकमेकांना शेअर करतो आणि त्याच्यातच आनंदी असतो.
तुला सांगू मला ना कधी कधी शंखाच येते बघ की तु खरंच माझ्या आयुष्यात आलायस म्हणून. ए तु मला कधी सोडून तर जाणार नाहीस ना? बघ हा ….! …नाही मला तस वचन दे.
बघ ना कधीच कॉलेज पण पूर्ण होत आल. आता ही फायनल exam झाली की सगळे आपापल्या करिअर च्या मागे पळत सुटतील.मग कुणालाही वेळ नसेल एकमेकांशी बोलायला. ए पण आपण नाही हा विसरायचं एकमेकांना, भले ही आपल्याला कुणी दुसरे मित्र /मैत्रिणी मिळूदे पण आपण कायम सोबत राहायचं.
तुला माहिती आहे माझी आई मला रोज काहींना काही सांगत असते , म्हणते बाई ग कुणासोबत पळून बिळून जाऊ नकोस हा तस काही असेल तर सांग,लग्न तरी लावून देऊ. (थोडी मस्करी करत)
त्यांना पण काळजी वाटतेच ना रे आपल्या मुलांच सगळं नीट व्हाव म्हणून. आपल्याला जॉब मिळाला आणि करिअर ला सुरुवात झाली की मग घरी पण सांगू , तोपर्यंत माझी तरी हिम्मत नाही होणार घरच्यांसमोर जाऊन उभ राहआहेस.
काय ! बर्थडे गिफ्ट ! नाही हा ….मला गिफ्ट वैगेरे काही नको फक्त तु हवा आहेस, आणि हो पैसे उगाच खर्च नको करू. सेविंग करत जा .तुलाच फायदा होईल नंतर.
[हमे फॉलो करे( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]
हे पण वाचा:
Monologue For Audition in Hindi | टॉप ऑडिशन स्क्रिप्ट
1 Minute Monologues For Females| फक्त एक मिनीटाची ऑडिशन स्क्रिप्ट
Marathi Natak Script For Students PDF Download| मराठी नाटक स्क्रिप्ट ऑडिशन
Tag: Marathi Natak Script For Students,marathi natak script, Drama Stories in Marathi, Marathi Drama Short Film, Best marathi natak script for students,Marathi natak script for students pdf download, Drama Script, Marathi One-Act Play Script , marathiauditionscript.