कॉमेडी ऑडिशन स्क्रिप्ट | Comedy Audition Script in Marathi

पूर्वकल्पना :

एक मुलगा आहे जो एका मुलीवर खूप प्रेम करतोय आणि तो तिच्या प्रेमात इतका वेडा झाला आहे की तो तिच्यासाठी काहीही कारायला तयार आहे. आज तो खूप वेगळा दिसत आहे, दररोज लपून पाहणे, एकतर्फी प्रेम करणे त्याला आता बस झाले आहे. आज त्याने ठरवलय की तो त्या मुलीला प्रपोज करणार. [नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]

हे एक कॉमेडी स्क्रिप्ट( Comedy Audition Script ) आहे, शाब्दिक जागा, शारीरिक हालचाली या सगळ्याचा समन्वय साधून स्क्रिप्ट सादर केल्यास ते योग्य वाटेल. सादर करण्याआधी ते परत परत वाचने आवश्यक आहे तरच त्यातील बारकावे लक्षात येतील.

पात्र :

मुलगा ( वय वर्ष २०-३० )

वेळ:

१ मिनिट २० सेकंद

comedy-audition-script
कॉमेडी ऑडिशन स्क्रिप्ट | Comedy Audition Script in Marathi

Short Comedy Audition Script | कॉमेडी ऑडिशन स्क्रिप्ट

(सुटकेचा श्वास सोडतो) काय करू या प्रेमाचं ? वर, खाली, आजूबाजूला, इकडे-तिकडे म्हणजे सगळीकडे मला नुसतं प्रेमच दिसतंय. सगळीकडे नुसतं गुलाबी -गुलाबी. म्हणजे तुम्हाला सांगतो मी एवढा प्रेमात बुडालेलो आहे ना की स्वतःची बनियन पण मला गुलाबीच दिसते. ते नाही का कावीळ झालेल्याला संपूर्ण जग पिवळ दिसत तस मला प्रेमाची कावीळ झाली आहे .. गुलाबी गुलाबी, फक्त माझे डोळे आणी नख गुलाबी झाली नाही आहेत.

असो एकंदरीत तुम्हाला कळलंच असेल की कोणत्या लेवल पर्यंत प्रेमात बुडालेला आहे. बुडालेला म्हणजे जवळजवळ मरेपर्यंत बुडालेला आहे. नाकातोंडात नुसतं प्रेम भरलंय, चुळ मारली तरी प्रेम निघतय. पण  मला कळत नव्हतं की नक्की हे कशामुळे होतंय, गेले १७ दिवस नुसता विचार करतोय, तुम्हाला सांगतो हे १७ दिवस एक थेंब सुद्धा घेतलेला नाही (दारूची बाटलील ओपन करतानाची acting करतो), म्हणजे पाण्याचा एकसुद्धा थेंब घेतलेला नाही.

काय झाल असेल मला या विचारानेच वेडा झालो होतो पण फायनली मला आज ते कारण सापडलय ज्यामुळे माझ्या आयुष्याचे ……(थोडा पॉज) ….हे एवढे बदल झालेत. राणी नाव आहे तिच , तुम्हाला सांगतो नावाप्रमाणे दिसायला पण एकदम ….(थोडासा हावरेपणा चा भाव चेहऱ्यावर आणी body language  मध्ये सुद्धा). नाही म्हणजे खूप सुंदर आहे ती.
अस वाटत कॉलेज ला सुट्टीच येऊ नये, सतत ती डोळ्यासमोर असावी, म्हणजे डोळे उघडले की अरे बापरे तु इथे पण ! इतकी ती डोळ्यासमोर असायला हवी.

पण आज बस झाल रोज रोज गुलाबी गुलाबी चा कंटाळा आलाय, आज काहीतरी लाल लाल करूया, म्हणजे मी ठरवलंय की तिला लाल गुलाब देऊन प्रपोस करायच. actually मी कालपासून प्रॅक्टिस करतोय की कस प्रपोस करू,आणि आज फायनली ती वेळ आलीय. थोडीसी भीती आहे काय होईल ? कस होईल ? जे पन होईल आज इतके दिवस तुडुंब भरलेल्या माझ्या मनाच्या धरणाचे दरवाजे उघडूनच टाकतो. जाऊदे जे काय वाहून जायच ते जाऊदे .

[नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]

हे पण वाचा:

स्कूल /कॉलेज साठी मराठी ड्रामा स्क्रिप्ट |Marathi Drama Script For Children’s

Tollywood Number 1 Hero Kon Hai | टॉलीवूड नंबर १ हीरो कौन है ??

1 Minute Comedic Monologues For Male Free | १ मिनिट कॉमेडी ऑडिशन स्क्रिप्ट

comedy-audition-script
comedy-audition-script
Download Now

Tag: Comedy Audition Script in Hindi,Short comedy audition script,Comedy audition script pdf,Comedy audition script for females, कॉमेडी ऑडिशन स्क्रिप्ट | Comedy Audition Script in Marathi ,1 minute comedic monologues for Females,2 person scenes comedy,Comedy scripts for acting,Comedy Scenes scripts.

Leave a Comment