1 Minute Monologues For Females| फक्त एक मिनीटाची ऑडिशन स्क्रिप्ट

पूर्वकल्पना :

आज मी तुमच्यासाठी एक खास स्क्रिप्ट घेऊन आलो आहे जी खास करून महिलांसाठी आहे 1 Minute Monologues For Females। वैदयी आणि मानव ही दोघे नवरा बायको. सुट्टीच्या दिवसांत ते दोघेही फिरायला जातात. मानव चा मित्र त्या ठिकाणच एक हॉटेल यांना सुचवतो . ठरल्याप्रमाणे ते दोघे त्या हॉटेल मध्ये राहायला जातात परंतु तिथे त्यांना काहीतरी विचित्र प्रकार निदर्शनास येतो. आता पुढे.. .. आवडल्यास प्लीज कॉमेंट करा आणि प्रतिक्रिया कळवा.

[नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]

पात्र :

वैदयी ( वय वर्ष २५-३० )

वेळ :

१ मिनिट

1-Minute-Monologues-For-Females
फक्त एक मिनीटाची ऑडिशन स्क्रिप्ट |1 Minute Monologues For Females

1 Minute Monologues For Females For Auditions | महिलांसाठी एक मिनीटाची ऑडिशन स्क्रिप्ट

किंकाळी……आ …आ …आ….मानव ….मानव  इकडे ये … कोण आहे ? ” कोण आहे तिकडे ” …समोर या …कोण आहे ? मानव तिकडे कोणीतरी आहे. मी आत्ता माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, तु प्लीज बघ ना जरा. हा  तिकडेच , “अरे मी पाहिलंय खरच “. कोणीतरी होत तिकडे.

हे बघ मला इकडे खूप भीती वाटते आहे. आपण जेव्हापासून या हॉटेल मध्ये आलोय तेव्हापासून काही ना काही होतच आहे. सकाळी आलेला तो हॉउस किपींग बॉय, ती कॅटर्र्स वाली आणी तो reception वर बसलेला माणूस. हे सगळेच जरा विचित्र वाटताहेत.तुला आठवतंय आपण जेव्हा हॉटेलबाहेरच्या चाहवाल्याला या हॉटेल चा पत्ता विचारला होता तेव्हा तो काय म्हणाला होता. ” क्यो मौत के मुह मे जा रहे हो ” , जरा विचार कर की तो सहज जरी म्हणाला असला तरी का ? काहीतरी कारण असेलच ना.

अजून एक आपण जेव्हा चेक इन केल त्यावेळी ते आधीच्या कस्टमर शी भांडत होते, का तर त्यांनी immediate चेक आऊट केल म्हणून. एकंदरीत यांचं management बघता मला तरी अस वाटतंय की या हॉटेलमध्ये नक्कीच काहीतरी कारस्थान सुरु आहे.मानव आपण आत्ताच्या आता इथून निघून जाऊ, हे बघ मला अजून रिस्क नाही घायची .आतापर्यंत जे जे घडतंय त्यावरून माला तरी अजून इथे थांबायचं नाही. चल चल तु आवरायला घे आता अजून विचार करू नकोस, तुझ्या मित्राला सांग खूप छान हॉटेल बघून दिल म्हणून.

तुला काय मस्करी वाटतेय सगळी, तुला कळत कस नाहीये हे वरवर जेवढं दिसतय तसं नाहीये. हे बघ मी शेवटचं विचारते आहे तु येतोस की मी जाऊ, तु ये अगर नको येऊ मी मात्र इथे एक क्षणभर ही थांबणार नाही आहे.

[नक्की फॉलो करा ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]

हे पण वाचा:

फिल्मसाठी ऑडिशन स्क्रिप्ट मराठी | Marathi Serial Audition 2024

महाराष्ट्राची हास्यजत्रा कलाकार ,कास्ट,लेटेस्ट एपिसोड,Judges Name, Singer Name, Director, Writer.

1 Minute Monologues For Females Free PDF | मोनोलॉग स्क्रिप्ट फॉर फ़ीमेल

1-Minute-Monologues-For-Females
1-Minute-Monologues-For-Females
Download Now

Tag: 1 minute monologues for Females comedy, 1 minute monologues for females for auditions, marathi audition script, audition script for female, 1 minute monologues for Black females, Female monologues from plays, audition script marathi.

Leave a Comment