Monologue in Marathi( Malvani ) | मोनोलॉग इन मराठी /मालवणी

पूर्वकल्पना :

मित्रहो आज मी तुमच्यासाठी झणझणीत मालवणी ऑडिशन स्क्रिप्ट घेऊन आलोय ” Monologue in Marathi( Malvani ) | मोनोलॉग इन मराठी /मालवणी “ . या स्क्रिप्ट मध्ये आपल्याला दिसत आहे की या ठिकाणी नाटक बसवण्याची तयारी चालू आहे. एकंदर गोष्टींचा अंदाज घेऊन सांगायच झाल तर ” शोले “ या चित्रपटावरून हे नाटक ही मंडळी बसवत आहेत. या नाटकातील एक character डायरेक्टर ची बोलते आहे अस आपण म्हणूया.. बर दुसरी गोष्ट अशी की हे स्क्रिप्ट “मालवणी ” भाषेत आहे त्यामुळे कुठल्याही मालवणी प्लॅटफॉर्म साठी तुम्ही याचा उपयोग करू शकता.

पात्र:

पुरुष /मुलगा 25-45 वर्ष

वेळ:

1 मिनिट 30 मिनिटे

Monologue-in-Marathi
Monologue in Marathi( Malvani ) | मोनोलॉग इन मराठी /मालवणी

Monologue in Marathi For Male | मोनोलॉग इन मराठी फॉर मेल

अरे ओ सांबा कितने आदमी थे? क्या 2 आदमी? वो दो और तुम चार फिरभी मुह उठाकर भागकर आये, आ थू…. दादानुं दादानुं कसा केलय? नाय म्हणजे वाटलो ना गब्बर सिंग. काय हा ना तुम्ही माका असले रोल अजूनपर्यंत कधी दिलास नाय. प्रत्येक वेळी नुसते फालतू रोल देतास कधी शिपायी ,कधी पुतळो ,कधी वॉचमन ….. स्टेजवर मी असतंय की नाय ता पण लोकांका कळत नाय, पण ह्या टायमाक तसा नाय होवचा.

मी काय म्हणतंय ह्यो गब्बर नक्की हा कसो ? म्हणजे ह्यो शेम टू शेम हा काय वेगळो हा? माका वायचं डिटेल मधी सांगा. कसा हा मी ना डिटेलिंग करणारो नट असय. माका एकदा पात्र गावला ना काय मी जाणून बुजून तेका माझ्या अंगात घुसवतंय. कसो करू सटलं करू की लाऊड करू …अगदीच नाय तर शेन्टर करू? …. नाय नाय शेन्टर म्हणजे माझ्या पद्धतीत ….हा हा हा (थोडा गडबड करत …भूमिका करायला मिळाल्याची जास्त उत्सुकता असल्याचे भाव चेहऱ्यावर)

दादानुं मी काय म्हणतंय बसंती कोण आसा? नाय म्हणजे मागच्या टायमांक तुम्ही शब्द दिलेलास की फूडच्या वर्षी बसंती ऑर्डर करूया म्हणान. नाय नाय तसा नाय ऑर्डर करूया म्हणजे मागवूया …म्हणजे बोलावूया.

कसा हा बसंती बजेटमध्ये आसली ना काय काम करूंक कसा मजा येता.(स्वतःशीच बोलल्यासारख पण आवाज बाहेर गेला पाहिजे) येवा येवा ….

दादानुं हे बघा जय आणि विरु हेन्का अजून म्हायतच नाय हा आम्ही हडे तालीम पण सुरु केलव ती. काय रे ए तुमका टायमावर येवंक येना नाय काय ? हडे गब्बर खोळांबलो हा. (उशिरा आलेल्या 2 नटांना बघून)

हा हा …आता बघू नुको हा …कारण गब्बर आता मी करणार आसय. ह्यो हातातलो पट्टो बघलंस ..? नाय तुमची दोधांची सुरली केलय तर बघा. चल पटापट कामाक लागा.

हे पण वाचा:

Marathi Audition Script For Female(आई Monologue) | मराठी ऑडिशन स्क्रिप्ट

Marathi Audition Script For Male(Monologue)| मोनोलॉग स्क्रिप्ट PDF डाउनलोड free

Short Monologue in Marathi PDF Free | मोनोलॉग स्क्रिप्ट इन मराठी पीडीएफ फ्री

Monologue-in-Marathi
Monologue-in-Marathi
Download Now

आम्हाला फॉलो आणि subscribe नक्की करा :

Instagram

Facebook

Youtube

Tag: Monologue in Marathi( Malvani ) | मोनोलॉग इन मराठी /मालवणी, Monologue in marathi for male, Monologue in marathi for boy, Short monologue in marathi, Monologue in marathi for students, Monologue in Hindi, Marathi audition script.

Leave a Comment