पूर्वकल्पना :
एक व्यक्ती आहेत, त्यांना एक मुलगा बायको असा छोटासा संसार आहे. ही व्यक्ती ऑफिसला कमाल जात असते, मुलगा शाळेत आणि बायको housewife असते . एक दिवस ऑफिस मधून येताना एक वस्तू घरी घेऊन येतात आणि काही दिवसांनी ती वस्तू परत ऑफिसला नेण्यासाठी कपाटाचा दरवाजा उघडतात पण ती वस्तू त्यांना जागेवर दिसत नाही. वस्तू न दिसल्यामुळे त्यांचा पारा वर चढतो आणि डोक्यात राग गेल्यामुळे बायकोला हाक मारून लागतात , आता बायको तिथे येते व ही व्यक्ती बायकोला वस्तूं न मिळत असल्याचा जाब विचारते . आणि पुढे…(वडील या पात्रासाठी ऑडिशन स्क्रिप्ट | Marathi Monologue Audition Script For Mail)
पात्र :
वडील (वय 35-40 वर्ष )
भाषा :
प्रमाण मराठी
वेळ :
2 मिनिटे
मोनोलॉग ऑडिशन स्क्रिप्ट इन मराठी | Marathi Monologue Audition script
हे बघ तुला किती वेळा सांगितलय की माझ्या वस्तूंना मला विचारल्याशिवाय हात नको लावत जाऊस. 100 वेळा सांगितलं तरी तेच, प्रत्येक गोष्टीत पुढे पुढे करायचं असतं तुला .
आता हरवली ना माझी वस्तू , ऑफिस मधून आलो तेव्हा इथेच ठेवली असणार .
मूर्खपणाचा कळस नुसता.
आता मनातल्या मनात धुसपूस करायची काही गरज नाही, शोधा आणि बघा कुठे सापडते का .
आनि हो मी रूम मध्ये नसताना उगाच माझ्या सामानाची ढवळाढवळ करत जाऊ नकोस .
आ आ…..काय तर म्हणे पसारा, तू फक्त पसारा आवरलास की मोठा काम केलं असं नाही हा.
इकडे तिकडे घरातली दोन चार काम केली की झालं बाकी काय काम असतं तुला, इकडे दिवसभर बाहेर ऑफिसमध्ये मर मर करायचं आणि घरी आल्यावर हे सगळं, तुला काय वाटत नाही का ग ? आपला नवरा दमून घरी येतो त्याला काही हवं नको ते बघाव. ते नाही! नसती उठाठेव करायची सवय जाणार नाही .
आणि हो हे बघ उद्या माझ्या बहिणीकडची माणसं घरी जेवायला येणार आहेत , कृपा करून हे असलं सगळं मला नकोय . जे काय करायचय त्याची आजपासूनच तयारी करा नाहीतर ऐनवेळी घोळ घालायची सवय आहेच आपली, नाही का ? .
कुठे शोधू आता सापडत पण नाहीये, तो शेजारच्या मुलगा तर माझ्या रूममध्ये आला नव्हता ना? काय ग मी काय विचारतोय ? तो शेजारचा कार्टा तर काल आला नव्हता ना ?
अरे मग गेलं कुठे? आकाशात उडालं की जमिनीने गिळलं ? एवढीशी एक वस्तू मी खोलीत आणून ठेवतो काय… एका दिवसात ते इकडची तिकडे जाते काय….. कुठे गेली कोणी नेली कुणाला याची खबर नाहि, अरे काय चाललंय काय या घरात ?
मला तर आता भीतीच वाटायला लागली आहे कुणावर विश्वास ठेवावा कुणावर नाही काहीच कळत नाही… अग मी काय म्हणतो.. (फोन वाजतो)
एक मिनिट हा…… हॅलो….. हा रमेश बोल….. काय?….. अच्छा.. हो का … चालेल चालेल ठीक आहे.
( जरा चाचपडत…… कोमल सुरात …… )
अच्छा अग शोधायची गरज नाहीये ती वस्तू ऑफिसमध्येच राहीली आहे. बर निघतो मी… ऐक ना जरा गाडीची चावी देतेस…. आणि रुमाल सुद्धा विसरलोय.. थँक्स….।
आम्हाला फॉलो आणि subscribe नक्की करा :
Marathi Monologue Audition script | फ्री मध्ये स्क्रिप्ट PDF मिळवा :
Tag : Marathi Monologue Audition script,marathi natak script pdf free download,marathi audition,serial audition script,monologue marathi,monologue audition script,मराठी ऑडिशन स्क्रिप्ट ,marathi audition script,scripts for auditions,मराठी नाटक स्क्रिप्ट pdf.